सातारा – लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदार सघांत आज शुक्रवार दि. 19 रोजी 16 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. तर आतापर्यंत एकूण 33 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.
वैशाली शशिकांत शिंदे, (रा. ल्हासुर्णे ता. कोरेगाव, नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरचंद्र पवार) पक्ष, सीमा सुनील पोतदार, (रा. पुसेसावळी ता. खटाव, अपक्ष), प्रतिभा सुनील शेलार, (रा. 79, सोमवार पेठ, सातारा, अपक्ष),
विठ्ठल सखाराम कदम, (रा. जोर, ता. वाई, अपक्ष), शशिकांत जयवंतराव शिंदे, (रा. ल्हासुर्णे ता. कोरेगाव, नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरचंद्र पवार) पक्ष), प्रशांत रघुनाथ कदम, (रा. वडगाव (उंब्रज) ता. कराड, वंचित बहुजन आघाडी पक्ष), विश्वजित अशोक पाटील, (रा. उंडाळे, ता. कराड, अपक्ष), उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले, (जलमंदिर पॅलेस सातारा भारतीय जनता पार्टी पक्ष), मारुती धोंडीराम जानकर, (रा. शिवनगर दरे खुर्द, सातारा शहर, अपक्ष), आनंदा रमेश थोरवडे,
(रा. बुधवार पेठ, कराड बहुजन समाज पार्टी पक्षाकडून 2 नामनिर्देशनपत्र) , अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले (रा, 338 गुरुवार पेठ, सातारा अपक्ष), सचिन सुभाष महाजन, (रा. बुध ता. खटाव, अपक्ष), सदाशिव साहेबराव बागल, (रा. गोवे ता. सातारा अपक्ष), गणेश शिवाजी घाडगे, (रा. शिबेवाडी (कुंभारगाव) ता. पाटण, अपक्ष), तुषार विजय मोतलिंग (रा, कळंबे, ता. वाई, बहुजन मुक्ती पार्टी पक्षाकडून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.