नगर – भाजप मधील अंतर्गत वादामुळे शहर व जिल्हा कार्यकारिणीला तब्बल चार महिन्यांनतर मुहूर्त मिळाला. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने मोर्चे बांधणी सुरु केली. मात्र, या मोर्चे बांधणी साठी जुण्या नव्यांचा मेळ घालता घालता तब्बल चार महिने कार्यकारणीला प्रतिक्षा करावी लागली. आज ही प्रतिक्षा संपली असून भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर यांनी शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. कार्यकारणीची आजची संख्या लक्षात घेता, पालकमंत्री विखे यांच्या कार्यकर्त्यांना विषेशस्थान देत शहर जिल्हाध्यक्षांनी कार्यकारिणी जाहिर केली.
शहर जिल्हाध्यक्ष आगरकर यांनी या कार्यकारिणीत तब्बल दहा उपाध्यक्ष, आठ सरचिटणीस यांच्यासह मंडल अध्यक्ष आणि आघाडी प्रमुखांचा समावेश केला आहे. ऍड. आगरकर यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कार्यकारिणी निवडीकडे लक्ष लागले होते. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही कार्यकारिणी महत्त्वाची मानली जात होती.
मात्र, या कार्यकारिणीत पालकमंत्री विखे यांच्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना विषेश स्थान देण्यात आले आहे. तर माजी खासदार स्व. दिलीप गांधी (गट) व माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना यांच्याकडे मात्र दुर्लक्ष करणात आले असल्याचे या कार्यकारिणीत दिसत आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे जुन्या नव्याचा मेळ घालता घालता कार्यकारिणी तब्बल चार महिने प्रतीक्षा करावी लागली. यात अनेकांची मनधरणी करत जिल्हाध्यक्षांची दमछाक झाली.
या कार्यकारणीत उपाध्यक्षपदी नगरसेविका सोनाली चितळे, संध्या पावसे, अशोक गायकवाड, अनिल ढवण, अनंत देसाई, धनंजय जाधव, बाबा सानप, महेश झोडगे, प्रवीण ढोणे, तुषार पोटे यांची नियुक्ती केली आहे. सरचिटणीसपदी सचिन पारखी, अनिल मोहिते, प्रशांत मुथा, सविता कोटा, पंडित वाघमारे, महेश नामदे याना संधी दिली आहे.
विविध आघाडी प्रमुख असे; युवा – मयूर बोचुघोळ, महिला – सुप्रिया जानवे, किसान – राजेंद्र एकाडे, अनुसूचित जाती – नरेश चव्हाण, अनुसूचित जमाती – महेश शेळके, अल्पसंख्यांक – हाजी अन्वर खान, ओबीसी – बाळासाहेब भुजबळ. मंडल अध्यक्ष : नितीन शेलार (सावेडी), राहुल जामगावकर (मध्य नगर), शामराव बोळे (भिंगार), निलेश सातपुते (केडगाव).