नगर -सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्स मध्ये चोरी करणाऱ्या टोळीतील फरार असलेला आरोपीला कोतवाली पोलिसांनी सुरत (गुजरात) येथून अटक केली आहे.
सोनसिंग बच्चनसिंग शिकलकर उर्फ भोंड रा. रेल्वेस्टेशन, शिकलकरी वस्ती, नाशिकरोड, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांना गुजरात पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात यश आले.
सराफा बाजारातील संतोष सीताराम वर्मा यांच्या दुकानात 1 ऑक्टोबर 2023 रोजी चोरी झाली होती. दुकानातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 24 लाख 68 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी गेल्याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांनी चोरी करणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना जेरबंद केले होते. या गुन्ह्यातील तिसरा फरार आरोपी सोनसिंग बच्चनसिंग शिकलकर उर्फ भोंड हा सुरत येथे असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांनी आरोपीला सुरत येथून अटक केली आहे.