अहमदाबाद : माजी केंद्रीय मंत्री आणि गुजरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांचा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला त्यांची पत्नी रेश्मा पटेल यांनी काढला आहे. रेश्मा पटेल यांनी पती भरतसिंग सोलंकी यांचे दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. आता मात्र या व्हिडिओवरून हा आरोप सिद्ध होतांना दिसत आहे.
Gujarat Congress leader Bharat Singh Solanki Extra Marital Affair…Wife Caught and Make video pic.twitter.com/JlHMZJZpTw
— Dheeraj sharma (@dheer23) June 1, 2022
सोशलवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भरत आणि रेश्मा यांच्यात अनेक दिवसांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. यातच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये कॉंग्रेस नेते भरतसिंह सोलंकी हे एका तरुणीबरोबर खोलीत असल्याचे दिसत आहे.
खोलीचा दरवाजा उघडून सोलंकी यांच्या पत्नी रेशमा सोलंकी अचानक आत आल्या. आपल्या पतीला परक्या बाईसोबत बघून भरतसिंह सोलंकी यांच्या पत्नीने मोठा कहर केला. दरम्यान, हा व्हिडिओ समोर येताच गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
भरत सोळंकी या महिलेसोबत खोलीत बंद होते
रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी रेश्मा पटेलला माहिती मिळाली की तिचा पती भरत सोलंकी एका महिलेसोबत एका खोलीत बंद आहे. ही बातमी कळताच रेश्मा आपल्या काही लोकांसह खोलीत पोहोचली आणि महिलेचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केला. व्हिडिओ बनवण्यासोबतच रेश्माने महिलेला मारहाणही केली. व्हिडिओमध्ये रेश्मा या महिलेला गुजराती भाषेत शिव्या देताना आणि जोरजोरात चापट मारताना दिसत आहे.
रेश्माने महिलेला थप्पड मारली
रेश्मा पटेल यांच्यासोबत असलेल्या लोकांनी खोलीत प्रवेश करताच महिलेचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. महिलेने आपला चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला असता रेश्माने महिलेला चपराक दिली.
यापूर्वीही वाद झाला होता
भरतसिंह सोलंकी आणि रेश्मा पटेल यांच्यातील हा काही नवीन वाद नाही, याआधीही पती-पत्नी एकमेकांवर मारहाणीचे आरोप करत होते. काही महिन्यांपूर्वी भरत सिंह सोलंकी यांच्यावर पत्नी रेश्माने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. रेश्मा म्हणाली की ती भरत सिंहला घटस्फोट देणार नाही. तिने पतीविरोधात बोरसद न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. काही वर्षांपासून दोघांमध्ये हा वाद सुरू होता. भरतसिंह सोलंकी हे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचे पुत्र आहेत.