पुढील दोन दिवसांत राज्यात पुन्हा मुसळधार?

पुणे – पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील “महा’ चक्रीवादळाचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. आता हे वादळ पश्‍चिम-मध्य आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर आहे. दरम्यान, दि.7 नोव्हेंबरला हे चक्रीवादळ दिव व पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता अहे, त्यामुळे उत्तर किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

चक्रीवादळाचा प्रभाव कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात झाला आहे. गेल्या 24 तासांत विदर्भातील तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा, तर कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस झाला, तर मराठवाड्यात हवामान कोरडे होते. दरम्यान, मंगळवारी (दि. 5) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. मात्र, नेहमीप्रमाणे वेधशाळेलाच पावसाने हुलकावणी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.