मुंबई – अलीबाबा दास्तान-ए-काबुल फेम अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली.प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवर गळफास लावून घेतला. तुनिषा ही केवळ 20 वर्षांची होती. अभिनेत्रींच्या आत्महत्येनंतर टीव्ही जगतासह संपूर्ण बॉलीवूडला धक्का बसला. मराठी कलाकारांकडून अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी अभिनेत्री स्नेहा वाघने देखील याबाबत एक ट्विट केले आहे.
बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्याने अभिनेत्री स्नेहा वाघ चांगलेच चर्चेत आली होती. स्नेहा हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. टीव्ही जगतातील मराठी आणि हिंदी मधील प्रसिद्ध चेहरा अशी स्नेहाची ओळख आहे. स्नेहाने तुनिषाबाबत एक ट्विट केले आहे. ज्यात ती म्हणते,“कधीकधी सत्यावर विश्वास ठेवणं कठीण असते. तू खूप लवकर गेलीस. RIP तुनिषा” असं लिहीत स्नेहाने तुनिषाच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.
Sometimes it’s hard to believe the truth. Gone too soon! #RIP Tunisha ❤️
Condolences to her family and friends!— SSneha Wagh 🦁 (@the_sneha) December 24, 2022
पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा सहकलाकार शीजान खानला अटक करण्यात आली आहे. शीजानचे तुनिषाबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या नैराश्येतूनच तुनिषाने ही आत्महत्या केली असं तिच्या आईचं म्हणणं आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली.