भारतीय क्रिकेट संघाचा स्टार बॅट्समन केएल राहुल आणि अथिया शेट्टी अखेर विवाहबंधनात अडकले. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्या विवाहाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. या विवाह सोहळ्यासाठी दोन्हही परिवारासह जवळचे मित्र आणि निवडक व्हीआयपी लोक उपस्थित होते.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि राहुल मागील बऱ्याच काळापासून रिलेशनमध्ये होते. त्यानंतर दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला.विवाहानंतर पहिल्यांदाच केएल राहुलने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ज्यावरून समजते की के एल राहुल फिटनेसबाबत किती काळजी घेतो. के एल राहुलने जिममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आगामी क्रिकेट करिअरसाठी आणि सुरु होणाऱ्या क्रिकेटच्या नवीन सीरिजसाठी के एल राहुलने मेहनत सुरु केली आहे. दोन फेब्रुवारी तो टीम इंडियासोबत दिसणार आहे. म्हणूनच के एल राहुलने फिटनेसच्या दृष्टीने मेहनत सुरु केल्याचे समजते.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 4 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. 9 फेब्रुवारीला यातील पहिला सामना होणार आहे. त्याअनुषंगाने राहुल टीममध्ये दाखल होईल. म्ह्णून राहुलने आपली तयारी सुरु केल्याचे समजते. लग्नानंतर के एल राहुलच्या रेसेप्शनची चर्चा सुरु होती मात्र आता राहुलनेच आपल्या खेळावर फोकस केल्याचे समजते.
View this post on Instagram
लग्नानंतर राहुल जिममध्ये हजर झाल्याने कसरत प्रेमींनी त्याचे विशेष कौतुक केले आहे. राहुलचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. सुनिल शेट्टी यांच्या खंडाळा येथील बंगल्यावर 23 जानेवारीला हा विवाह सोहळा पार पडला होता. या सोहळ्याला क्रीडा आणि चित्रपट जगतातील अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली होती.