मुंबई – बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील आयकॉनिक “हॅंड पंम्प’ सिन लोक आवर्जून पाहतात. सोशल मीडियावर देखील या चित्रपटातील अनेक व्हिडिओ आजही व्हायरल होतात.
या चित्रपटात सनी देओलसह अभिनेत्री अमिषा पटेलने मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान, या चित्रपटाचा सिक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘गदर-2’ चित्रपटाचे शूटिंग देखील पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर देखील ‘गदर-2’च्या शूटिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.
दरम्यान, आता या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. काल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ‘गदर-2’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख आणि अभिनेता सनी देओल याचा नवीन लूक रिलीज करण्यात आला आहे. स्वतः सनी देओलनं सोशल मीडियावर गदर-2 चं पोस्टर शेअर केलं आहे.
हे पोस्टर शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा! आम्ही तुमच्यासाठी दोन दशकांनंतर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सिक्वेल घेऊन येत आहोत. 11 ऑगस्ट 2023 रोजी गदर-2 रिलीज होणार आहे.’ सनीच्या या पोस्टला कमेंट करुन त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
सनीने चित्रपटाच्या पहिल्या भागात ज्या पद्धतीने ‘हॅंड पंम्प’ उखडून टाकला होता. तोच स्वॅग सनीचा ‘गदर 2’ मध्येही दिसणार आहे. हा एक फुल ऑन अॅक्शन पॅक्ड चित्रपट असणार असणार आहे. आता प्रेक्षक सुद्धा ‘गदर 2’च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.