बीजिंग – चीनच्या पूर्वेकडील झेजियांग प्रांताला इन-फा या वादळाने आज तडाखा दिला आहे. या वादळानुळे सेकंदाला 38 मीटर इतक्या वेगाने वारे वहात होते. तर अतिवृष्टीमुळे मरण पावणाऱ्यांची संख्या 63 वर पोहोचली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावर्षात आतापर्यंत सहाव्यांदा चीनला वादळाचा फटका बसला आहे. इन-फा वादळ दुपारी 12.30 वाजता पटुओ जिल्ह्यातील झुशान शहराता थडकले, असे स्थानिक पूर नियंत्रण मुख्यालयाने सांगितले. या वादळाचा दुसरा फटका झेजियांगचे जियाक्सिंग शहर आणि जिआंग्सु प्रांताच्या किडोंग शहराला बसेल, अशी शक्यता हवामान अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
दरम्यान 21 जूनच्या पूरात मरण पावणाऱ्यांची संख्या वाढून 63 झाली आहे. अजूनही 5 जणांच्या मृत्यूबाबत अद्यापही कोणतही खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही. यामध्ये भुयारी मार्गात अडकलेल्या रेल्वेमध्ये अडकून मरण पालेल्या 12 जणांचाही समावेश आहे.
दरम्यान पूराचया पाण्याला वाट मिळावी म्हणून चीनने एक धरण फोडून पाणी वाहून जाऊ दिले आहे. या पूरामध्ये आतापर्यंत 65.5 अब्ज युआन (10 अब्ज डॉलर) इतके आर्थिक नुकसान झाले आहे.