पहिल्या दिवशी संख्या रोडावली : आजपासून पालिकेच्या माध्यमिक शाळा
पिंपरी – दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुन्हा सोमवारपासून काही शाळा गजबजल्या. इंग्रजी माध्यमांच्या बहुतांश खाजगी शाळांची सुरुवात झाली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची धावपळ पुन्हा एकदा सुरु झाली. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या रोडावली. खाजगी शाळा सुरु झाल्या असल्या तरी महापालिकेच्या माध्यमिक शाळांना आज मंगळवार (दि.5) नोव्हेंबर पासून सुरवात होणार आहे.
गावाहून परत आलेल्या बालचमूंनी शाळेच्या पहिल्याच दिवशी जाण्याचा कंटाळा केला. त्यामुळे प्ले स्कूल पासून ते चौथीच्या वर्गांपर्यंत संख्या कमी राहिली. पहिल्याच दिवशी काहींच्या चेहऱ्यावर उत्साह होता तर काही विद्यार्थी कंटाळवाणे होते. शाळेत गेल्यानंतर मात्र विद्यार्थी मित्र कंपनीत रमले. पहिल्या तासाला दिवाळीच्या सुट्टीत शाळेत सांगितलेला अभ्यासाची तपासणी झाली. प्ले स्कूलचे विद्यार्थ्यांचा पहिला तास खेळात आणि तपासणीत गेला. काही शाळांत शिस्त आणि सूचनांचे पालन करण्याचा मंत्रही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला.
मुलांच्या शाळा सुरु झाल्याने पालकांचे पुन्हा वेळापत्रक बदलले. काही पालकांनी मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी गर्दी केली. आज पासून शहरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सुरवात झाली असली तरी तर मंगळवारी महापालिका शाळांची तसेच खासगी काही शाळांची सुरुवात होणार आहे.
11 नोव्हेंबरपासून किलबिलाट
इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुरवात झाली असली महापालिकेच्या प्राथमिक शाळा सुरु होण्यास मात्र अद्याप आवकाश आहे. महापालिकेच्या प्राथमिक शाळा पुढील सोमवारी दि. 11 नोव्हेंबर पासून सुरवात होणार आहे. तर माध्यमिक शाळांना आज सुरवात होणार आहे.