मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्य केल्या प्रकरणी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालं होतं. मात्र राणे यांना अखेर महाड न्यायालयाने दिलासा दिसा असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कोर्टाने नारायण राणे यांना महिन्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होण्याचे आदेश दिले आहे. तसेच, भविष्यात यापुढे अशी चूक ( वादग्रस्त विधान ) होणार नाही, अशी ग्वाही खुद्द नारायण राणे यांनी कोर्टात दिली आहे. त्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.
त्यांना जमीन मंजूर झाल्यावर त्यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केले आहे या ट्विटमध्ये राजनीती चित्रपटातील अभिनेते मनोज वाजपेयी यांचा व्हिडियो शेअर केला आहे. या चित्रपटही डायलॉगचा व्हिडीओ नितेश राणेंनी शेअर करत एक प्रकारे शिवसेनेला इशारा दिला आहे. मगर आसमान में थूकने वाले को शायद यह पता नहीं है, की पलट कर थूक उन्हीं के चेहरे पर गिरेगा, करारा जवाब मिलेगा…. करारा जवाब मिलेगा….” असा हा डायलॉग आहे.
काय आहे नितेश राणे यांचे ट्विट
— nitesh rane (@NiteshNRane) August 24, 2021