Gold-Silver Price Today : या वर्षाच्या शेवटच्या सत्रात सोने-चांदी दिलासा देण्याची शक्यता फारशी दिसत नाही. सोने-चांदी पुन्हा महाग झाले आहे. ऐन लग्नसराईत सोने-चांदीने उचल खाल्ली आहे. ग्राहकांना सराफा बाजारात जाताना जादा रक्कम सोबत ठेवावी लागेल. सोने-चांदी पुन्हा उच्चांकाकडे सरकले आहे. काय आहेत भाव?
आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ६३,२०० रुपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६३,२९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
रिपोर्टनुसार, चांदी ७५,०३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,६४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,८२३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६३,०८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,८२३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,०८० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,८२३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,०८० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५७,८२३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,०८० रुपये आहे.