मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांनी देखील मालिकांना जशास तसे उत्तर दिले आहे. अशातच आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे तापलेलं वातावरण थंड करण्यासाठी अमृता फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.
अमृता फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबतची माहिती देताना, “सध्याच्या द्वेषमूलक राजकीय वातावरणात, हे कूल गाणं ऐकून चिल-पिल घ्या” असा संदेश लिहिला आहे. याबाबतची पोस्ट लिहताना अमृता फडणवीस यांनी #Anniversary_Special असा हॅशटॅग देखील दिला आहे. अमृता फडणवीस व देवेंद्र फडणवीस यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच १७ नोव्हेंबरला पार पडला असून त्यानिमित्तानेच अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेली ही खास भेट आहे.
मात्र सोशलवर मीडियावर ट्रोलिंग आणि टीकापासून बचावासाठी अमृता फडणवीस यांनी कॉमेंट्स चा पर्याय वगळा आहे. मात्र सोशलवर वरील युजर्सने ट्विट त्यांचा गाण्याचा व्हिडियो रिट्विट करत त्यांच्यावर ट्रोलिंग केली आहे.
पुरुष दिनाच्या दिवशी हे ऐकावं लागल्याबद्दल कमेंट केलीय तर काहींनी तुम्ही गायिका असल्याने अशापद्धतीने एखाद्या गाण्याचं हिंदी व्हर्जन गाण्याऐवजी नवीन गाणी गायली पाहिजेत असा सल्ला दिला आहे.