Bobby Deol : अभिनेता रणबीर कपूरचा अॅनिमल (Animal) सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात अभिनेता बॉबी देओलच्या भूमिकेने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातील बॉबी देओलच्या अभिनयाची खूप कौतुक केले जात आहे. याशिवाय त्याचा फिटनेस पाहून देखील सारेचजण चकित झाले आहेत. या चित्रपटानंतर तो जास्त चर्चेत आला.सध्या सोशल मीडियावर बॉबी देओलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात बॉबीचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
व्हायरल व्हिडीओमध्ये बॉबी देओल दिल्ली विमानतळावर असल्याचे दिसत आहे. त्याला बघताच पापाराझींनी त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गर्दी केली. तसंच चाहत्यांनीही बॉबीला पाहताच त्याच्याभोवती गराडा घातला. यावेळी तो ब्लॅक शर्ट- पँट, गॉगलमध्ये पाहायला मिळाला. पण तो प्रचंड घाईत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. आपल्या टीमसोबत तो घाईत वेगाने चालत जात होता. तेव्हा वाटेतच उभा असलेल्या एका माणसाला त्याने खांद्याला धरुन बाजूला सारले. त्याची ही कृती नेटकऱ्यांना चांगलीच खटकली आहे.
View this post on Instagram
बॉबी देओलच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याच्यावर टीका केली आहे. ‘एक फिल्म काय हिट झाली आणि हवा डोक्यात गेली’, ‘पंचवीस वर्षात एक हिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेते चाहत्यांना अशी वागणूक देतात’ अशा शब्दात नेटकऱ्यांनी बॉबीवर टीका केली आहे. बॉबीने अॅनिमल सिनेमात ‘अबरार’ ही निगेटिव्ह भूमिका साकारल्याने तो अजूनही त्याच भूमिकेमध्ये आहे का असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, अॅनिमल चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर आता बॉबी देओल तामिळ चित्रपटात पदार्पण करणार आहे. साऊथ स्टार सुर्याच्या ‘कांगुवा’ (Kanguva) या चित्रपटात बॉबी काम करणार आहे. तमिळ दिग्दर्शक शिवा यांच्या ‘कंगूवा’मध्ये बॉबी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.