मुंगेरीलाल के सपने सारखे मुनगंटीवार यांचे स्वप्न महाराष्ट्राला माहीत आहे
मुंबई: मुंगेरीलाल के सपने सर्वांना माहीत आहे तसे मुनगंटीवार यांचे स्वप्न महाराष्ट्राला आता प्रसिद्ध झाले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वप्नांवर तोफ डागली आहे.
दरम्यान पाच वर्षानंतर मुंगेरीलाल की सपने तसे मुनगंटीवार के सपने असं पुस्तक आम्ही प्रसिद्ध करु असा टोलाही जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.
सुधीर मुनगंटीवार हे पाच वर्ष वित्त मंत्री असताना फक्त महाराष्ट्रातील जनतेला स्वप्नेच दिली. त्यातील काहीच पूर्ण झाली नाहीत. आता विरोधी पक्षात आहेत. रोज – उद्या आपलंच सरकार येणार या स्वप्नात ते आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.
रोज उठून मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा किंवा आणखी काही आलं तर हे दोन्ही पक्ष बाजूला होतील का? अशाप्रकारची स्वप्नरंजने मुनगंटीवार करत आहेत असा जोरदार टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.