‘नवरात्री’च्या सुट्ट्या कॅन्सल

अहमदाबाद – गुजरात सरकारने आज नवरात्री उत्सवासाठी जाहीर केलेला आठ दिवसांच्या सुट्टीचा निर्णय मागे घेतला आहे. गुजरात सरकारने गतवर्षी पहिल्यांदाच राज्यातील सरकारी व निमसरकारी शाळा व महाविद्यालयांमध्ये नवरात्री उत्सवासाठी आठ दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षी देखील सरकारने नवरात्री निमित्ताने ३० सप्टेंबर ते ७ ऑक्टोम्बर दरम्यान शाळा व महाविद्यालयांना आठ दिवस सुट्टी देण्याबाबतचा आदेश दिला होता. मात्र काही शाळांच्या व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाने राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा यांनी सांगितले की, “शाळा व महाविद्यालय व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकांनंतर राज्य सरकारने मुख्यमंत्री विजय रूपांनी यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्री निमित्ताने आठ दिवस सुट्टी न देण्याचा निर्णय घेतला आहे.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.