अर्थसंकल्प सादर करण्याआधीच फोडला, हे पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारे- जयंत पाटील

मुंबई: सत्ताधारी पक्षाच्या वतीने अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्याआधीच फोडण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्राला हे न शोभणारे आहे म्हणूनच आज विधानसभेच्या पायऱ्यांवर याविरोधात आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाची सायबर क्राईम विभागामार्फत चौकशी व्हायला हवी अशी मागणी याप्रसंगी आम्ही केली, असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, फोडण्यात आलेला अर्थसंकल्प हा सभागृहाचा अवमान असून हे कृत्य नेमके कोणासाठी व कोणाच्या फायद्यासाठी करण्यात आले ते सर्वांसमोर येणे गरजेचे आहे.


दरम्यान, याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर मी तपासून पाहिले. ट्विटरवर आलेले सर्व ट्विट हे भाषणाआधी आलेले नाहीत. त्यात १५ मिनिटांचे अंतर आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावेळी पीएमच्या ट्विटमध्ये फक्त २ ते ३ मिनिटांचे अंतर असते. त्याची लाईव्ह बातमीही सुरु असते’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अर्थसंकल्प ट्विटरवर फुटला : मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

 

Leave A Reply

Your email address will not be published.