मुंबई -अभिनेता ‘सलमान खान’च्या चित्रपट कारकीर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘तेरे नाम’. सलमानच्या आजवरच्या सर्व चित्रपटांपैकी ‘तेरे नाम’ या चित्रपटामध्ये त्याने सादर केलेल्या अभिनयाला अनेकांनी दाद दिली. या चित्रपटात प्रेमी युगुल राधे (सलमान खान) आणि निर्जरा (भुमिका चावला) यांची कहाणी दाखवली गेली होती.
तेरे नाम चित्रपटात निर्जलाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ‘भूमिका चावला’ या चित्रपटात नंतर रुपेरी पडद्यापासून गायब झाली आहे. लग्नानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला.
भूमिकाने दाक्षिणात्य चित्रपटातून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली होती. दरम्यान तिला ‘तेरे नाम’ चित्रपटात सलमान खानसह काम करण्याची ऑफर मिळाली. पंजाबी कुटुंबात जन्माला आलेल्या भूमिकाचा पहिला चित्रपट युवाकुडु हा होता.
भूमिकाने हिंदीच नाही तर तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी व पंजाबी चित्रपटात काम केलं.भूमिकाने अल्पावधीतच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं होतं. 2001 साली प्रदर्शित झालेल्या कुशी चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्म फेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
2004 मध्ये भूमिकाने अभिषेक बच्चनसह ‘रन’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर भूमिकाने पुन्हा एकदा सलमानसह ‘सिलसिले’ आणि ‘दिल जो भी कहे’ या चित्रपटात काम केले.
२००७मध्ये आलेल्या ‘गांधी, माई फादर’ या चित्रपटानंतर भूमिकाने बॉलिवूडपासून ब्रेक घेतला होता. त्यानंतर भूमिकाने 2016 मध्ये ‘एमएस धोनी: द अनटोल्ड लव स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कम बॅक केला.