मुंबई – करोनाचा वाढता प्रादुर्भाव घराबाहेर पडता येईना… घरामध्ये अपुरे साहित्य… जीवनावश्यक वस्तू घरापर्यंत पोहोचेनात, मदतीसाठी परिवारही बरोबर नाही, आजारी असणाऱ्यांना रुग्णालयापर्यंत नेण्याची व्यवस्था उपलब्ध नाही,अशा या संकट काळात सर्वच लोक एकमेकांच्या मदतीसाठी साहाय्य करत आहे यातच बॉलीवूड सेलेब्स सुद्धा संकटात सापडलेल्या लोकांना मदती साठी पुढे सरसावले आहे.
The dabbawalas have been serving us for decades & bringing food to so many Mumbaikars. Now is the time when we should come forward and support them! @CMOMaharashtra @AUThackeray @SunielVShetty https://t.co/n6g4r3IrvP
— Sanjay Dutt (@duttsanjay) June 8, 2020
दरम्यान, या करोनाच्या संकटात सापडलेल्या मुंबईतील डबेवाल्यांचा देखील विचार करावा अशी विनंती अभिनेता संजय दत्त याने केली आहे. डबेवाल्यांच्या मदतीसाठी सर्वांनी पुढे यावे असे मत त्याने व्यक्त केले आहे.
संजय दत्त म्हणाला की,’डबेवाले गेल्या अनेक दशकांपासून मुंबईकरांची सेवा करत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत आपण त्यांना मदत करायला हवी.” अशा आशयाचे ट्विट संजय दत्तने केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना देखील या ट्विटमध्ये त्याने टॅग केले आहे. संजय दत्तचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांमध्ये शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.’