काबूल: तालिबानच्या ताब्यात गेलेल्या अफगाणिस्तानमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. लाखो लोक देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी नागरिकांनी काबूल विमानतळावर धाव घेतली आहे. देश सोडून जाण्यासाठी अनेकांसमोर काबूल हाच एकमेव पर्याय उरला असताना आज तिथेही गोळीबार झाला आणि सर्वत्र गोंधळ उडाला. लोक सैरावैरा पळू लागले. त्यात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या अमेरिकेने काबूल विमानतळ ताब्यात घेतला आहे. अमेरिका ६ हजार सैनिक काबूलमध्ये उतरवण्याच्या तयारीत आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडत असताना आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक होत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Another Saigon moment: chaotic scenes at Kabul International Airport. No security. None. pic.twitter.com/6BuXqBTHWk
— Saad Mohseni (@saadmohseni) August 15, 2021
राजधानी काबूलमधील विमानतळावर सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे. त्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. काबूल विमानतळावरील परिस्थिती दाखवणारे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यातून परिस्थितीचे गांभीर्य आणि भीषणता दिसून येत आहे.
Awful, chaotic scenes at Hamid Karzai International Airport. People scrambling and no where to go. Woman says “look at the state of the people of Afghanistan” #Kabul pic.twitter.com/5Ohe1c81uB
— Yalda Hakim (@BBCYaldaHakim) August 15, 2021
अफगाणिस्तानात अडकलेल्या स्वकियांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काबूल विमानतळावरील परिस्थिती बिघडत असल्याचे दिसताच अमेरिकेने विमानतळावर नियंत्रण मिळवले. काबूलमधल्या हमीद करझाई विमानतळाला सुरक्षा देण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने दिली. हवाई वाहतूक नियंत्रणदेखील अमेरिकेच्या ताब्यात आहे.