मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रियालिटी शो “इंडियन आयडॉल-12’च्या सीजनमधील विजेता काल निश्चित करण्यात आला. ‘इंडियन आयडॉल-12’ च्या सिझनच्या ट्रॉफीवर पवनदीप राजनने आपलं नाव कोरलं. या यशामुळे पवनदीपचे संपूर्ण भारतभरातून स्वागत केले जात आहे. यावेळी पवनदीपचा 25 लाख रुपये तसेच ट्रॉफीच्या स्वरुपात सन्मान करण्यात आला.
View this post on Instagram
मागील वर्षभरापासून इंडियन आयडॉल हा गायनाचा शो सुरु होता. इंडियन आयडॉल या कार्यक्रमाला संपूर्ण भारतभरातून पसंदी मिळाली. सोशल मीडिया, तसेच यूट्यूबच्या माध्यमातून या कार्यक्रमाची नेहमीच चर्चा होत आली आहे.
View this post on Instagram
शनिवार- रविवार असे दोन दिवस इंडियन आयडॉल-12 चा सीजन तब्बल 12 तास रंगला होता. या भव्य एपिसोडमध्ये ग्लॅमरसह बॉलीवूडचाही तडका लावण्यात आला. या शो साठी बॉलिवूडच्या अनेक दिग्ज आणि प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती.
पहिला क्रमांक – पवनदीप राजन (विजेता)
दुसरा क्रमांक – अरुणीता
तिसरा क्रमांक – सायली कांबळे
चौथा क्रमांक – मोहम्मद दानिश
पाचवा क्रमांक – नेहाल
सहावा क्रमांक – षण्मुखप्रिया