नवी दिल्ली: करोना साथीच्या भीतीमुळे महिलांच्या आरोग्याला धोका असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधीने (यूएनएफपीए) दिला आहे.
वेगवेगळ्या देशातील बहुतांश महिलांनी करोनाच्या भीतीने आणि लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे स्वयंविलगीकरण केले आहे. त्यातील सुमारे 4कोटी 70 लाख महिलांकडे गर्भनिरोधकांची कमतरता आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात 70 महिलांवर नको असलेले बाळंतपण लादले जाणार आहे. लॉकडाऊन वाढवल्यास कौटुंबिक हिंसाचार आणि नको असलेले बाळंतपण यांच्या संख्येत वाढ होणार आहे, असे यूएनएफपीएच्या या अहवालात नमूद केले आहे.
गरीब आणि मध्यमवर्गीय देशातील चार कोटी 70 लाख महिला आधुनिक गर्भनिरोधक मिळवू शकत नाहीत. त्यामुळे लॉक डाऊन जर सहा महिन्यांच्या काळासाठी सुरू राहिला तर 70 लाख बाळंतपणे लादली जातील, असे या अहवालात नमूद केले आहे. याच काळात महिलांवरील अत्याचाराच्या तीन कोटी 10 लाख घटना घडतील. जर तीन महिने लॉकडाऊन वाढला तर महिलांवरील अत्याचाराच्या अतिरिक्त एक कोटी 50 लाख घटना घडतील.
कोविड 19 मुळे बालविवाह रोखण्याच्या प्रयत्नांवरही पाणी पडेल. 2020 ते 2030 या काळात एक कोटी 30 लाख अतिरिक्त बालविवाह होतील. अन्य स्थितीत ते रोखले गेले असते, असे या अहवालात नमूद केले आहे.
या साथीमुळे असमानता अधिक सखोल होईल. आपल्या कुटुंबाचे नियोजन करण्याची क्षमता लाखो महिला गमावून बसतील. त्यांच्या ारोग्य आनि शरीराचीही त्या काळजी घेऊ शकणार नाहीत. महिलांचे जननक्षम आरोग्य आणि हक्क यांचे संरक्षण कोणत्याही किंमतीवर व्हायलाच हवे.
डॉ. नतालिया कानेम
कार्यकारी संचालक, यूएनएफपीए