पुणे, दि.1 – अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील दापोडी व केडगाव येथील तीन गुळ उत्पादकावर कारवाई करुन सुमारे 5 लाख 33 हजार 870 रुपयांचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त केली. दापोडी येथील मे. सचिन गुळ उद्योग व मे.सुपर स्टार गुळ उद्योगाचे मालक सचिन मोहिते या गुळ उत्पादकावर धाडी टाकुन धाडी टाकुन भेसळयुक्त गुळ व साखरेचे नमुने घेऊन उर्वरित 51 हजार 30 रुपये किंमतीचा सुमारे 1 हजार 458 किलो गुळ व 51 हजार रुपये किंमतीची 1 हजार 500 किलो साखरेचा साठा जप्त करण्यात आला होता.
केडगाव येथील मे. समर्थ गुळ उद्योगाचे मालक अमोल गव्हाणे या गुळ उत्पादकावर धाडी टाकुन भेसळयुक्त गुळ व साखरेचा एक नमुना घेऊन उर्वरित 3 लाख 72 हजार 640 रुपये किंमतीचा सुमारे 10 हजार 960 किलो गुळ व 59 हजार 200 रुपये किंमतीची 1 हजार 850 किलो साखर जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत सातत्याने अशी कारवाई होत असून, सध्या बाजारात उपलब्ध गुळाबद्दल शंका निर्माण झाली आहे.
ग्राहकांनो, तक्रार करा
सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करुनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.