शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य नाव दत्तकला

महाराष्ट्राला शिक्षणमहर्षीची एक मोठी परंपरा आहे. याच परंपरेतील एक अग्रगण्य नाव म्हणजे, स्वामी चिंचोली (भिगवण) तालुका दौंड येथील प्रा. रामदास झोळ सर यांची “दत्तकला शिक्षण संस्था. शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या नावीन्यपूर्ण आधुनिक अध्ययन अध्यापनाच्या पद्धतीने इंदापूर, दौंड तालुक्‍यात अल्पावधीतच पालकांच्या पसंतीची “दत्तकला शिक्षण संस्था’ ठरली आहे.

कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिकीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, सुसंस्कार, आधुनिकतेची कास धरत मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीमुळे राष्ट्राच्या विकासात भर घालणारे भावी नागरिक घडविणारे ठिकाण म्हणजे ‘दत्तकला शिक्षण संस्था’. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य आणि आधुनिक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि व्यक्‍तिमत्त्व विकास अतिशय प्रभावीपणे आकार देणारी म्हणून “दत्तकला शिक्षण संस्थे’कडे उच्चशिक्षित सुजाण पालकांचा कल स्थापनेपासून उत्तरोत्तर वाढत आहे.

सामाजिक कार्य
– दुष्काळी भागात पाणी टॅंकर व चारा वाटप
– गरीब लोकांसाठी रेशनकार्ड व शैक्षणिक कागदपत्रे मोफत मिळवण्यासाठी शिबिरांचे आयोजन
– स्वच्छता अभियान व वृक्षारोपण
– पाणी फाउंडेशनच्या कामाला मदत
– गरीब विद्यार्थ्यांना केजी ते
– पीजीपर्यंत शिक्षणासाठी मदत

कोविड-19 काळातील कार्य
– इंजिनिअरिंग डिग्री व डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या प्रथम 100 मुलींना मोफत प्रवेश, तसेच संस्थेच्या केतूर शाखेत11 वी विज्ञानसाठी 30 मुलींना मोफत प्रवेश
– संस्थेच्या 60 खोल्या विलगीकरण कक्षासाठी
– दौंड व इंदापूर तालुक्‍यांमधील विलगीकरण कक्षासाठी 500 बेड
– गरीब कुटुंबांना 500 किराणा किटचे वाटप
– तीन तालुक्‍यांमध्ये सॅनिटायझर, हॅन्डग्लोज व मास्कचे वाटप
– परराज्यातील मजूर सोडविण्यासाठी बस

संस्था व संस्थापक यांना मिळालेले पुरस्कार
– गौतम स्मृती फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय संजीवनी पुरस्कार
– राज्यस्तरीय विद्याभूषण पुरस्कार
– सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आयकॉन पुरस्कार
– सह्याद्री उद्योग समूहाकडून सह्याद्रीरत्न पुरस्कार
– सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल समाजभूषण पुरस्कार
– एज्युकेशन अवॉर्ड आणि एक्‍सलन्स अवॉर्ड

संस्थेची वाटचाल
2006 : संस्थेची स्थापना
2008 : स्कूल विभाग
2009 : इंजिनिअरिंग डिप्लोमा व एमबीए
2010 : इंजिनिअरिंग डिग्री
2011 : सी. बी. एस. ई. स्कूल
2012 : इंजिनिअरिंग विभागाचे पदव्युत्तर शिक्षण
2014 : औषध निर्माण शास्त्र विभाग पदवी व करमाळा तालुक्‍यात स्कूल व ज्यु. कॉलेज
2016 : औषध निर्माण शास्त्र विभागाचा पदविका अभ्यासक्रम
2016 : फक्‍त मुलींसाठी औषध निर्माण शास्त्र (डिप्लोमा व डिग्री)अभ्यासक्रम
2020 : बी. सीए., एम. सीए. , करमाळा तालुक्‍यात प्रथमच औषध निर्माण शास्त्र विभागाचा पदविका अभ्यासक्रम.

दत्तकला शिक्षणसंस्थेत 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश निश्‍चित करण्यासाठी 9075680865, 9673002929, 9922051144, 9763332929 या क्रमांकावर संपर्क साधावा.

शब्दांकन : डॉ. सुरेंद्र शिरसट (भिगवण )

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.