मुंबई – शिवसेनेकडून पालिका निवडणुकीत विशिष्ट वयोगटातील उमेदवारांनाच तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत या चर्चा फेटाळल्या आहेत.
शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळते असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या काही नगरसेवकांना डावलणार असून त्यांच्या जागी तरुणांना संधी देणार असल्याची चर्चा रंगली होती.
शिवसेनेत आता ज्येष्ठांऐवजी तरुणांना संधी देण्याचा विचार असल्याचे बोलले जात होते. मात्र आदित्य ठाकरेंनी हे वृत्त फेटाळले आहे.