तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका पहिल्याच आठवड्यापासून प्रेक्षकांची मन जिकताना दिसत आहे. या मालिकेच्या निमित्ताने हृषिकेश आणि शिवानी सोबत कविता लाड-मेढेकर आणि विजय गोखले हे देखील मध्यवर्ती भूमिकेत आहेत. कविता लाड आणि विजय गोखले बऱ्याच काळानंतर डेलीसोप मध्ये दिसणार आहेत.
अधिपतीने नववीनंतर शिक्षण सोडलं कारण भुवनेश्वरीचं म्हणणं आहे की शिक्षणाने कुणाचं भलं होत नाही, शिक्षण हे गरिबांसाठी असत त्यामुळे त्यांना नोकरी लागते.
या आठवड्यात अधिपतीच्या लग्नासाठी भुवनेश्वरी स्वयंवर भरवणार आहे. या स्वयंवरासाठी भुवनेश्वरीच्या ३ अटी आहेत, मुलगी ठीकठाक दिसणारी असेल तरी चालेल, ती श्रीमंत नसेल तरी चालेल पण सगळ्यात महत्वाची अट म्हणजे मुलगी अशिक्षित हवी. पण ह्या स्वयंवरामध्ये अक्षरा पोहोचलेय. अधिपती तिला बघून अवाक झालाय.
अक्षरा या स्वयंवरामध्ये कशी हा प्रश्न अधिपतील पडलाय त्यासोबतच तो मनातून खुशही आहे. त्यामुळे खरंच अक्षरा या स्वयंवरासाठी आलेय की हा अधिपतीचा भास आहे.