Actor Chhaya kadam | ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024’मध्ये हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकरांनी हजेरी लावली आहे. 14 मे पासून सुरू झालेले हे फेस्टिवल 25 मे पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमातील सेलिब्रिटींचे जबरदस्त लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातच आता मराठमोळी अभिनेत्री छाया कदमनेही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले आहे. पारंपारिक लुकमधील फोटो शेअर करत छायाने आईसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे.
छाया कदमने इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले. पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे. तरी आई! आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. लव्ह यू मम्मुडी आणि खूप खूप मिस यू.” आईची साडी, नथ, केसात गजरा, कपाळावर टिकली असा छाया कदम यांच्या मराठ मोळ्या लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, छाया कदम या मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. छाया कदम या फेस्टिव्हलमध्ये ‘लापता लेडीज’ चित्रपटानिमित्त गेल्या आहेत. या फेस्टिव्हलमध्ये अनेक अभिनेत्रींचे वेस्टर्न लूक पाहायला मिळाले. पण पहिल्यांदाच या फेस्टिव्हलसाठी पारंपरिक मराठमोळ्या अंदाजात छाया कदम यांची एन्ट्री पाहायला मिळाली.
छाया कदम यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, किरण रावच्या ‘लापता लेडिज’ चित्रपटात मंजू माईची भूमिका छाया कदम यांनी साकारली होती. याशिवाय त्यांनी ‘मडगाव एक्सप्रेस ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘सरला एक कोटी’ या हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
हेही वाचा:
‘केजरीवालांवर हल्ला करण्यासाठी पीएमओकडून कट’, संजय सिंह यांचा गंभीर आरोप