पर्यावरणीय बदलांमुळे माशांच्या प्रजनन क्षमतेत वाढ

ॲडलेड – न्यूझीलंडमधील ॲडलेड विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, माशांच्या काही जातींमध्ये प्रजननासाठी आवश्यक लैंगिक अवयव आकाराने मोठा असतो आणि त्यांची प्रजननांची क्षमताही जास्त असते. पीएलओएस बायोलॉजी या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

त्याठिकाणच्या समुद्रात कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढल्यामुळे माशांवर नकारात्मक परिणाम होईल असे मानले जात होते मात्र त्याउलट ह्या माशांनी समुद्रातील हा पर्यावरणीय बदल स्वीकारून अधिक शुक्राणू आणि अधिक अंडी घालणे सुरु केले आहे. या सगळ्यांमुळे माशांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे.

विद्यापीठातील एन्व्हायरन्मेंट अँड सदर्न सीज इकॉलॉजी लॅबोरेटरीतील प्रा. इव्हान नाजेकेरकेन यांच्या मते वातावरणात सोडण्यात आलेल्या कार्बन डाय ऑक्साईडपैकी एक तृतीयांश हा समुद्रात शोषला जातो. त्यामुळे समुद्राचे पाणी आम्लकारक होते. समुद्राचे आम्लकरण झाल्यामुळे त्याचा परिणाम समुद्रातील अनेक जीवांच्या वागण्यावर होतो.

परंतु ट्रिपलफिन माशाच्या जातीबाबत वेगळे परिणाम दिसून येते आहेत. या माशाच्या नर व मादी जातींवर सकारात्मक परिणाम होऊन त्यांच्यातील शुक्राणू व अंड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, नर जातीचे मासे अधिक खात आहेत दुसरीकडे मादी मासे जास्त खात नाहीत. त्याऐवजी त्यांनी दैनंदिन हालचाली कमी केल्या आहेत आणि त्या गर्भशयाची क्षमता वाढण्याकडे लक्ष देत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.