Assembly Election 2023 – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगड दुर्ग येथे निवडणूक रॅलीला संबोधित करत आहे. यादरम्यान जनतेशी संवाद साधतांना ते म्हणाले,’संपूर्ण राज्य म्हणते आहे की भाजपचं येणार.’ मोदींनी यावेळी राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर टीका करत ते म्हणाले,दोन दिवसापूर्वी रायपूरमध्ये ‘दोन दिवसांपूर्वी रायपूरमध्ये सापडलेले पैसे बुकींचे आहेत. दुबईतील जनतेशी आपले काय संबंध आहेत हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे.’ असं म्हणत मोदी यांनी टीका केली
मोदी पुढे म्हणाले,’दोन दिवसांपूर्वी रायपूरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती. जमा होणारा पैसा सट्टेबाजांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगावे की त्यांचे दुबईतील लोकांशी काय संबंध आहेत? काँग्रेसचे नेते लुटलेल्या पैशाने घरे भरत आहेत का? मुख्यमंत्री संतापले असून ते मैदानात उतरले आहेत. या पैशाची तार त्यांच्याकडे जात आहे. भ्रष्टाचाराने तिजोरी भरणे हे काँग्रेसचे प्राधान्य आहे.’
तत्पूर्वी, महादेव बेटिंग ऍपच्या प्रवर्तकांनी छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना 508 कोटी रूपये दिल्याची माहिती चौकशीतून पुढे आली, असा दावा शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस नेते बघेल ईडीच्या रडारवर येण्याची चिन्हे आहेत.
छत्तिसगढमध्ये ईडीने असीम दास नावाच्या कॅश कुरियरला अटक केली. त्याच्याकडून 5.39 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याने चौकशीवेळी महत्वाची माहिती दिल्याचा दावा ईडीने केला. जप्त करण्यात आलेल्या रकमेची व्यवस्था महादेव ऍपच्या प्रवर्तकांनी केली. छत्तिसगढमधील निवडणूक खर्चासाठी ती रक्कम बघेल नावाच्या राजकीय व्यक्तीला द्यायची होती, अशी कबुली दासने दिली. त्याच्या फोनची न्यायवैद्यक तपासणी करण्यात आली.