पुणे – महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मूलभूत प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशा सूचना पुरंदर हवेली चे आमदार संजय जगताप यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. यासंदर्भात आमदार जगताप यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली, या बैठकीस सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत गावांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे, सांडपाणी आणि कचरा यांसह अन्य मूलभूत सुविधा या विषयी चर्चा झाली, या गावांमध्ये नागरिकांना जाणवणाऱ्या समस्या सुध्दा जगताप यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत खाते प्रमुखांना प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्या.