नवी दिल्ली -आशियाई विकास बॅंक (एडीबी) यांच्याकडून कर्ज घेणाऱ्या देशांमध्ये भारताचे स्थान अग्रस्थानी राहिले आहे. वर्ष 2018 मध्ये एडीबीकडून भारताला जवळपास 3 अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळाले आहे. चालू वर्षात ही भारत सरकारला त्याच प्रमाणात कर्ज मिळण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. याच संदर्भात बोलताना एडीबीचे अध्यक्ष ताकेहिको नकाओ यांनी म्हटले की 2019 मध्ये पण भारताला एडीबीकडून 3 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कर्ज मिळेल.
भारतात पायाभूत सुविधा विकसनाच्या योजना सुरू करण्यात आल्यानंतर सर्वात उच्चाकी पातळीवरचे कर्ज पुरवठा झाल्याचे म्हटले आहे. बॅंकेच्या 52 व्या वार्षिक बैठकीदरम्यान बोलताना 2019 मध्ये ही आम्ही भारताला याच पातळीवर कर्जाचा पुरवठा करणार आहोत. असे नकाओ यांनी सांगितले आहे.