अतिशय संयमाने, नम्रतेने समोर आलेलं प्रत्येक काम तडीस नेण्याची हातोटी असलेले हवेली तालुक्यातील वाघोली येथील माजी उपसरपंच संदीप सातव. उपसरपंच असो वा नसो सदैव अवतीभोवती असणारा लोकांचा वावर आणि तेवढ्याच तत्परतेने सतत न थांबत अखंडपणे काम करण्याचा आवाका पाहता एवढी ऊर्जा कोठून येते या माणसात हा प्रश्न पडतो. समोर आलेली व्यक्ती मग समर्थक आहे की विरोधक हे न पाहता त्याचा प्रश्न, अडचण समजून घेऊन त्याला शक्य होईल ती मदत करण्याचा प्रयत्न करण्याची शैली, समोरच्याचे मन जिंकून घेत तसेच विकासाबाबत दूरदृष्टी असलेले नेतृत्व नियोजनबद्ध विकास म्हणजेच संदीप सातव अशी त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
वाघोली गावातील वॉर्ड क्रमांक सहामध्ये जनतेनी संदीप सातव, जयश्री काळे, मालती गोगावले यांना निवडून दिल्यानंतर तीन वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे 24 कोटीची विकासकामे वॉर्डमध्ये केली निवडून आल्या नंतर सर्वांत मोठी जबाबदारी होती ती वॉर्डमधील ड्रेनेज समस्या सोडवण्याची. वॉर्ड क्रमांक सहा भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि चढउताराचा आहे. यामुळे संपूर्ण वॉर्डचा खासगी एजन्सी लावून कंटोर सर्व्हे करून घेतला. सुमारे ग्रामपंचायत निधीमधून सुमारे 12 कोटी रुपये वॉर्ड क्रमांक सहामधील ड्रेनेजलाइन करण्यात आल्या.
तत्कालीन उपसरपंच संदीप सातव यांच्या मार्गदर्शनखाली वाघोलीमधील एकमेव वॉर्ड असा आहे की, ड्रेनेज लाइन ही नदीपर्यंत नेण्यामध्ये यश आले. मुख्य लाइन आव्हाळवाडी फाटा ते मुळा मुठा नदी, गणेशनगर, विनायक पार्क, सिद्धी पार्क, काळूबाई नगर, शांती पार्क, बालाजी पार्क, बालाजी विहार, गोल्डन सोसायटी, काळे ओढा, साईराज पार्क, समर्थ पार्क, इंकाई सोसायटी, नारायण पार्क, सातव पार्क, शिवतेज पार्क, गणराज पार्क, डोमखेल रोड रायसोनी कॉलेज परिसर, अनुसया पार्क, व इतर भागातील ड्रेनेजचा प्रश्न संदीप सातव मार्गदशनाखाली मार्गी लावला.
लोकसंख्येएवढी वृक्षलागवड, प्लॅस्टिक बंदी, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, सौरपथदिवे, करवसुली अशा पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील निकषांची पुर्तता करून गावाचा शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास करण्याचे त्यांच्यासह ग्रामपंचायत, गावाने निश्चित केले आणि गावात जनजागृती करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था या ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका संदीप सातव बजावत असतात. या संस्थांद्वारे गावाचा विकासाचे ध्येय ठेवून कार्य केलेले संदीप सातव त्यांच्या कार्यकाळासह आजही केवळ विकासकामे डोळ्यासमोर ठेवून गावाच्या अधिकाधिक विकासाचे ध्येयच त्यांनी बाळगले असून त्या दृष्टीने त्यांचा आहोरात्र प्रवास सुरू आहे. तीन वर्षांच्या कालावधीमध्ये 24 कोटी रुपयांची विकासकामे केली असल्याचे सातव यांनी नमूद केले.
ड्रेनेजलाइनची व्यवस्था केली
वाघोली गावातील वॉर्ड क्रमांक 6 मध्ये कुठल्याही प्रकारची ड्रेनेजलाइन व्यवस्था नव्हती. याचा विचार करून ड्रेनेजचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी संपूर्ण वॉर्डचा कंट्रोल सर्व्हे करण्यात आला. गणेशनगर, शिवतेज पार्क, विनायक पार्क, सिद्धी पार्क, काळूबाई नगर, बालाजी पार्क, गोल्डन सोसायटी, शांती पार्क, डोमखेल रोड, बालाजी विहार, केसनंद रोड, आव्हळवाडी रोडवरील सोसायटी, काळे ओढा, साईराज पार्क, इंकाय सोसायटी, समर्थ पार्क, जो कायमस्वरूपी ड्रेनेजमुक्त करण्यात यश आले आहे. वाघोलीमधील एकमेव वॉर्ड सहा ज्या वॉर्डची ड्रेनेजलाइन नदीपर्यंत करण्यास यश आले आहे.आव्हळवाडी फाटा ते मुळा मुठा नदीपर्यंत ड्रेनेजलाइनचे ऐतिहासिक काम करण्यात आले आहे.
प्रभू श्रीराम उद्यान
वाघोलीमधील लोकसंख्या सुमारे तीन लाख असून पुणे-नगर रस्त्यावरील दक्षिण भागात एक ही गार्डन नाही. याचा विचार करून गणेशनगर भागात एक एकरमध्ये ग्रामपंचायत निधी व स्वखर्चामधून देखणे “प्रभु श्रीराम उद्यान’ तयार करण्यात आले. यामध्ये जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, लहान मुलांना खेळायला खेळणी. या गार्डनचा उपयोग ज्येष्ठ नागरिक, महिलांना, मुलांना होत आहे.
आठवडे बाजाराचे रुपडे पालटले
वॉर्ड क्रमांक सहामध्ये आठवडे व रोजचा बाजार आहे. पाऊस काळामध्ये त्या भागामध्ये पूर्णपणे चिखलमय परिसर होत असे. याचा विचार करून तसेच वाघोलीमधील एकमेव क्रिकेट ग्राउंड असल्यामुळे याचा पण विचार करून ग्रामपंचायत बॉडीने ग्रामपंचायत निधीमधून भव्य दिव्य बाजार शेड तयार करून शेतकऱ्यांना बसण्यासाठी ओटे तयार करण्यात आले. यामुळे महिलांना, नागरिकांना पाऊस काळामध्ये कुठलाही त्रास होत नाही तसेच शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली.
अडचणीचे रस्ते केले पूर्ण
वॉर्ड क्रमांक सहामध्ये दोन महत्त्वाचे रस्ते आहे. केसनंद रोड व आव्हळवाडी रोड या दोन्ही रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती.नागरिकांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता.याचा विचार करून आव्हळवाडी रोडचे ग्रामपंचायत निधीमधून सुमारे दीड कोटी खर्च करून सिमेंटकॉंक्रिट रस्ता करण्यात आला. तसेच केसनंद रोडसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सिमेंटकॉंक्रिट रस्ता करण्यात आला. वॉर्ड सहा मधील नियोजन बद्ध विकास करण्यात आला. सुरुवातीला ड्रेनेजलाइन, पाण्याच्या लाइन, गॅसलाइन करून अंतर्गत रस्ते सिमेंटकॉंक्रिट करण्यात आले.
संकलन : दत्तात्रय गायकवाड (हवेली तालुका प्रतिनिधी)