झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळही पाहात राहावा. कुटुंबाबरोबरच समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी समाजातील गोरगरीब लोकांना नेहमी मदतीचा हात पुढे करून त्यांचे जीवनही सुखी करण्यासाठी अविरतपणे सामाजिक कार्य करणाऱ्या वाघोली येथील
माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील.
संघर्षमय प्रयत्नांतून आणली विकासाची गंगा
वाघोलीमध्ये पथदिव्यांचा प्रश्न असेल अथवा मजबूत रस्त्यांचा प्रश्न असेल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांच्या मागणीचा विचार करून तातडीने सातव कुटुंबांनी अग्रभागी राहून हे प्रश्न वेळोवेळी सोडवून आपल्या भागाचा विकास करून दाखवला आहे. याच कालावधीमध्ये वाघोलीमध्ये सिटी सर्व्हे ऑफिसदेखील बांधण्यात आले आहे. वाघोलीमधील पोस्ट ऑफिसची झालेली दयनीय अवस्थादेखील सातव यांच्या काळात दूर करण्यात आली आणि नवीन पोस्ट ऑफिसची उभारणी करून पोस्टाचे व्यवहार सुधारण्यात आले. वाघोलीतील सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील सातव-पाटील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करून अनेक ठिकाणच्या सांडपाण्याचा प्रश्न सोडवला आहे. वाघोलीमधील रस्ते, सांडपाणी पिण्याचे पाणी, नवीन प्रशासकीय इमारतीच्या बाबतीत राजेंद्र सातव-पाटील आणि जयश्री राजेंद्र सातव पाटील दाम्पत्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि त्यातून मिळवलेली यशस्विता कौतुकास्पद आहे.
नागरिकांच्या कलागुणांना वाव
शाळा, महाविद्यालय तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जोपासले गेलेल्या विविध छंद, कलागुण याबाबत विद्यार्थी, महिलांसाठी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री सातव पाटील यांनी लाखो रुपयांची बक्षिसे रोख स्वरूपात तसेच सोन्याची चेन, अंगठी देऊन विद्यार्थी व महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले आहे. ज्या महिलांनी खडतर प्रवास करून आपल्या कुटुंबाला सुसंस्कारीत करण्यासाठी प्रयत्न केले, अशा कुटुंबातील विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींचा व त्या माता, पालकांचा महिला दिनी सातव पाटील यांनी यथोचित सत्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
“ती’च्या सबलीकरणासाठी
महिलांचे संघटन करून त्या महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी जयश्री सातव पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. महिलांचे संघटन करून त्यांना बचतीची सवय लावून बचत गटाची उभारणी केली आहे. महिलांना बचतीची सवय लावून बचत गटाच्या परताव्याच्या रकमेतून महिला सक्षमीकरणावर त्यांनी भर दिला आहे. महिलांचे राहणीमान उंचावण्यासाठी त्यांचे वाढदिवस साजरे करणे, विमानप्रवास घडवून आणणे, ऐतिहासिक धार्मिक स्थळांना भेटी देणे, शक्य तेवढी आर्थिक मदत करणे असे उपक्रम राबवून महिलांमध्ये जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण वर्ग उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले.
करोनात दिला मदतीचा हात
मार्च-एप्रिल 2020 पासून सुरू झालेल्या करोनाच्या परिस्थितीमध्ये माजी सरपंच जयश्री सातव पाटील यांनी हवेली-शिरूरमधून भाजीपाला विकत घेऊन जवळपास 10 लाख रुपयांचा भाजीपाला वाघोलीमधील नागरिकांसाठी उपलब्ध करून तो घरोघरी मोफत वाटप केला. याशिवाय याच काळात डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, समाजसेवी संस्था यांनादेखील आरोग्य लाभदायक अशा साहित्यांचे तसेच फळांचे वाटप केले. वाघोलीमध्ये कामगारांची संख्या अधिक असल्याने या कामगारांना अन्नधान्यांचे मोफत कीट अथवा अन्नदानाच्या गावातील उपक्रमांमध्ये देखील जयश्री सातव आणि सातव परिवाराने सहभाग घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.
आगामी विकासाचे ध्येय
विरोधी नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, सुनील टिंगरे, नीलेश लंके, प्रशांत जगताप, भारती शेवाळे, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांच्या साथीने पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, यासाठी जयश्री राजेंद्र सातव पाटील अविरतपणे कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या वाघोली गावासाठी जवळपास 21 वर्षे महिला सबलीकरणासाठी वैयक्तिक तथा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जयश्री सातव पाटील यांनी प्रयत्न केले आहेत.
हेच प्रयत्न वाघोलीच्या विकासाची अनोखी दिशा बनू लागली आहे. तत्कालीन सरपंचपदाच्या कार्यकाळात माजी सरपंच जयश्री सातव पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाघोली गावासाठी 12 कोटी 50 लाखांची पाण्याची योजना कार्यान्वित केली. ही योजना राबवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी यांची मोलाची साथ त्यांना लाभली आहे.
विकासकामात भरीव योगदान
- वाघोलीसाठी 12 कोटी 50 लाखांची पाणी योजना
- डोमखेल रस्त्यावर 3 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली.
- वाघेश्वर मंदिरासमोर तीन लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली.
- गावात वेशीजवळ नवीन पाणी टाकी बांधली.
- मागासवर्गीय समाजासाठी दोन लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली.
- पोस्ट ऑफिस नवीन इमारत
- सिटी सर्व्हेचे नवीन कार्यालय
- ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी
- ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पाडण्यासाठी रोजचा बाजार ही संकल्पना राबवली
- अंतर्गत रस्ते व सांडपाण्याचे प्रश्न मार्गी
- सर्व धार्मिक स्थळे तसेच विविध धर्मीयांच्या कार्यक्रमांना वेळोवेळी लाखो रुपयांची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
प्रश्नांची सोडवणूक
वाघोली येथील पथदिवे, अंतर्गत रस्ते, सांडपाणी, पिण्याचे पाणी आदी सोडवण्यात जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोलाची कामगिरी केली.
प्रश्नांची सोडवणूक
संकलन : दत्तात्रय गायकवाड, हवेली तालुका प्रतिनिधी