दौंड तालुक्यातील राहू ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन आसपासच्या अनेक वाड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. त्यावेळी टेळेवाडी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. या गावातील टेळे कुटुंबीयांना तीन पिढ्यांचा सामाजिक, राजकीय वारसा आहे. कुटुंबातून बाळकडू मिळाल्याने माजी उपसरपंच- दत्तात्रयमामा टेळे यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. यातूनच त्यांनी टेळेवाडीची उपसरपंचपदाची धुरा लीलया पेलली होती. दत्तात्रयमामा टेळे यांनी आपल्या कार्यकाळात विकासकामांची गंगा गावात झिरपत ठेवली. त्यांच्या कार्यपैलूवर टाकलेला प्रकाशझोत…
राहू ही एकत्र ग्रामपंचायत असतानादेखील उपसरपंच दत्तात्रय टेळे यांचे आजोबा हे टेळेवाडीचे नागरिक राजाराम बायजी टेळे हे राहू ग्रामपंचायतीचे सदस्य होते. म्हणजे साधारणपणे तीन पिढ्यांचा समाजसेवेचा इतिहास म्हणावा लागेल. त्यानंतर राहू विकास सेवा सोसायटीमधून विभाजन होऊन टेळेवाडी विकास सोसायटीची निर्मिती होण्यापूर्वी राहू विकास सोसायटीचे सदस्य म्हणून उपसरपंच दत्तात्रय (मामा) टेळे यांचे चुलते तान्हाजी टेळे हे राहू सोसायटीचे अनेक वर्षे सदस्य होते.
विभाजन होऊन टेळेवाडी विकास सोसायटीची निर्मिती झाली. यामध्ये देखील तान्हाजी टेळे यांनी अनेक वर्षे चेअरमन म्हणून काम पाहिले आहे. हाच वारसा पुढे नेत राजाराम टेळे यांचे नातू दत्तात्रय (मामा) टेळे यांनीदेखील समाजसेवेचा हा वारसा पुढे चालवला आहे. मंडळ अधिकारी कार्यालयात काम करीत असताना अनेक गोरगरीब जनतेची विनामूल्य कामे करून देणे, अडीअडचणीवेळी मदत करणे, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणची गरीब व अज्ञान लोकांची अनेक कामे विनामूल्य केली आहेत. गरजू व्यक्तींना शिधापत्रिका वाटप, करोना काळात घरोघरी औषध फवारणी आदी कामे केली आहेत.
अनेक समाजोपयोगी कामामुळे एक नेतृत्व पुढे येत होते. तसा सामाजिक सेवेचा वारसा हा तीन पिढ्यांपासून होताच. त्याला मूर्तस्वरूप देण्याचे काम उपसरपंच दत्तात्रय (मामा) टेळे यांनी केले. नवीन पिढी व जुनी पिढी यांचा मेळ घालण्याचे काम उपसरपंच दत्तात्रय (मामा) टेळे हे करीत आहेत. विद्यमान उपसरपंच व विकास सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून काम करीत असताना खऱ्या अर्थाने दत्तात्रय (मामा) टेळे यांना गावाला एक विधायक दिशा दिली आहे.
प्रसिद्धीच्या झोतापासून खऱ्या अर्थाने लांब राहून किंगमेकरची भूमिका दत्तात्रय (मामा) टेळे हे करीत आहेत. ग्रामपंचायत असेल किंवा विकास सोसायटी असेल, निवडणुकीत दत्तात्रय (मामा) टेळे हे नेहमीच किंगमेकरची भूमिका बजावत आले आहेत. एकत्र मोठे कुटुंब, तसेच गावात असलेले अनेक पाहुणे-रावळे यामुळे दत्तात्रय (मामा) यांचे टेळेवाडीच्या राजकारणावर कायमच वर्चस्व राहिले आहे.
ग्रामपंचायतीचे कारभारी
* सरपंच *
रुपाली गिरीश भोसले
* सदस्य *
दत्तात्रय सोनबा टेळे
गिरीश भोसले, नितीन बापूराव कसबे, वर्षा आप्पासाहेब टेळे, सोनाली अर्जुन थोरात, छाया अनिल डुबे, शोभा अशोक टेळे, नीलम सतीश नवले
कुल कुटुंबीयांशी ऋणानुबंध
विद्यमान आमदार राहुल कुल यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. टेळे कुटुंब हे आजोबा, पणजोबाच्या काळापासून कुल घराण्याशी एकनिष्ठ आहेत. याचाच परिणाम उपसरपंच म्हणून काम करीत असताना मोठ्या प्रमाणात शासकीय निधी मिळविण्याचे काम दत्तात्रय (मामा) टेळे यांनी केले आहे.
स्मशानभूमीचा प्रश्न निकाली
1999 मध्ये राहू ग्रामपंचायतीमधून विभाजन झाले. त्यानंतर टेळेवाडी ग्रामपंचायतीसाठी स्मशानभूमीचा मोठा प्रश्न होता. त्यासाठी दत्तात्रय (मामा) टेळे यांनी आमदार कुल यांच्या मार्गदर्शनाखाली गायरान क्षेत्रातील 0.20 आर क्षेत्र हे स्मशानभूमीसाठी अधिग्रहित केले. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न दत्तात्रय(मामा) टेळे यांनी सोडवला आहे.
सर्वसमावेशक विकासकामे
2019 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत दत्तात्रय टेळे यांनी उपसरपंचपदी काम केले. आमदार राहुलदादा कुल यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन पाणीपुरवठा योजना 3 कोटी 84 लाख, राऊत वस्ती ते जुना मारुती डांबरीकरण रस्ता 20 लाख, पवार वस्ती ते वाघवस्ती रस्ता 5 लाख, गावठाण अंतर्गत गटार लाइन 5 लाख, लिमखोरी अंगणवाडी फिल्टर प्लॅन्ट 5 लाख, राऊत वस्ती ते आप्पासाहेब टेळे वस्ती मुरमीकरण 10 लाख, राऊत वस्ती ते दत्तनगर 10 लाख, मुरमीकरण, प्राथमिक शाळा वॉल कंपाउंड व स्टेज 1 लाख, गरजू व्यक्तींना शिधापत्रिका वाटप केली आहेत. वरील कामे मार्गी लावली आहेत. अनेक कामे ही प्रस्तावित आहेत. त्यासाठी त्यांचा पाठपुरावा केला आहे.
चुलते तानाजी टेळे, वडील सोनबा टेळे, बबनदादा टेले, उत्तम टेले, साहेबराव टेंगले, बाळासाहेब गाढवे, पंचायत समितीचे सदस्य किसनदादा शिंदे, बाबूराव टेंगले, अंकुश थोरात, यशवंत थोरात, बंडूआप्पा नवले, आमदार राहुलदादा कुल यांचे मार्गदर्शन त्यांना गावविकासासाठी ऊर्जा देणारे ठरले आहे.
संकलन : भाऊ ठाकूर, राहू.