अदाणी कॅपिटलला प्रतिष्ठेचा पुरस्कार

पुणे – अदाणी समूहातील बॅंकेत्तर वित्तीय संस्था अदाणी कॅपिटलने येथे संपन्न झालेल्या इंडिया बॅंकिंग समिट आणि 2019 सालच्या पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठेचा राइझिंग स्टार ऑफ द इयर 2019-एनबीएफसी पुरस्कार पटकावला आहे.

ऑक्‍टोबर 2017 मध्ये गुजरातस्थित थाराड येथे आपली पहिली शाखा सुरू केल्यानंतर, आजतागायत अदाणी कॅपिटलने राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 10,000 उद्योजकांना सहाय्य केले आहे. अदाणी कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले, यापुढे छोट्या उद्योजकांसाठी अधिक मूल्यवर्धित योजना प्रस्तुत करण्याची आणखी मोठी जबाबदारी आमच्यावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.