मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅननने अभिनयातून आपली ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. नुकतेच तिने एक निर्माती म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. क्रितीने ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. या अंतर्गत ती ‘दो पत्ती’ या चित्रपटावर काम करणार आहे. हा चित्रपट ब्लू बटरफ्लाइज कंपनीचा पहिला चित्रपट असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री काजोल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
नुकतेच क्रितीने काजोलसोबत तिच्या निर्मितीच्या पहिल्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. “मी जवळपास सात-आठ वर्षांनी काजोलसोबत एकत्र काम करणार आहोत. मी तिच्यासोबत ‘दिलवाले’मध्ये काम केले होते आणि हा माझा दुसरा चित्रपट होता. तेव्हा मी लहान मुलासारखा होते. मला काहीच माहीत नव्हते आणि अचानक या बड्या स्टार्ससमोर अभिनय करण्याची संधी मिळाली,” असे क्रिती म्हणाली. याशिवाय काजोल ही एक वाइबसारखी असल्याचेही तिने म्हंटले.
यावेळी क्रितीने चित्रपटाची सहनिर्माती आणि पटकथा लेखक कनिका ढिल्लोचेही कौतुक केले. “कनिका आणि मी एकत्र काम करण्याबद्दल अनेकदा बोललो आहोत. ती एक अशी व्यक्ती आहे जी खूप मजबूत, स्वतंत्र, अनोखी कथा लिहिते आणि प्रत्येक पात्राबद्दल तपशीलवार लिहिते. दरम्यान, क्रिती सेननचा ‘दो पत्ती’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आता पुन्हा एकदा क्रिती आणि काजोलचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंती पडणार का? हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, अलिकडेच क्रिती ‘आदिपुरुष’ या चित्रपटात ‘जानकी’च्या भूमिकेत दिसली होती. मात्र या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. या चित्रपटातील संवाद आणि वेशभूषेवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही.