मुंबई – तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा ही सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावरील सर्वात हिट जोडी आहे. त्यामुळे दोघे जिथे जातील तिथे त्यांच्यामागे मीडिया असतोच. शूटिंग सेट असो की रेस्टोरंट मीडिया त्यांना प्रत्येक ठिकाणी कॅच करतो. एवढेच काय नुकतंच या दोघांना कव्हर करण्यासाठी मीडियाने थेट त्यांच्या वॉशरूम बाहेर हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
झालं असं मुंबईतील एका कार्यक्रमात पोहोचलेल्या तेजस्वी आणि करणचे फोटो क्लिक करण्यासाठी फोटोग्राफर वॉशरूमच्या बाहेर उभे होते आणि तेजस्वी बाहेर येताच त्यांनी पटापट फोटो काढायला सुरुवात केली. वॉशरूम बाहेर येताच कॅमेरे फ्लॅश मारू लागल्याने अभिनेत्रीला देखील असू अनावर झाले. हे नेमकं काय सुरु आहे हे तिला समजेना. सुरु असलेला प्रकार पाहून अभिनेत्री लाजल्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
तेजस्वी आणि करण दोघेही बिग बॉसपासून एकत्र आहेत आणि आता दोघेही लग्न करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर या दोघांना प्रचंड फॅनफॉलोविंग आहे. नियमित टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये या जोडीची प्रचंड क्रेझ आहे. म्हणूनच घडलेल्या प्रकारावरून अनेकांनी सोशल मीडियावर संताप देखील व्यक्त केला आहे.