पुणे – सिनेअभिनेत्रींची फॅशन फॉलो करण्याची क्रेझ तरुणींमध्ये नेहमीच दिसते. मात्र कधीकधी विअर्ड ड्रेस, मेकअप किंवा फॅशन करून अनेक सिनेअभिनेत्री ट्रोल होतात. यात प्रियांका चोप्रापासून दीपिका पदुकोनपर्यंत आघाडीच्या अभिनेत्रींचा समावेश होतो.
असाच एक विअर्ड ड्रेस परिधान करून त्याचे फोटो सोनम कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या फोटोंमधील ड्रेस व्हाइट कलरचा आहे. विशेष म्हणजे या ड्रेसवर महिलेच्या शरीराची आकृती दिसत आहे. सोनम कपूरला या विचित्र आउटफिटबद्दल सोशल मीडियावर ट्रोलरचा सामना करावा लागत आहे.
अनेकांनी तिला ट्रोल करताना चित्रविचित्र संज्ञा वापरल्या आहेत. या ड्रेसमध्ये सोनमने तिचे केस वरच्या बाजूला बांधले असून ओठांना डार्क रेड लिपस्टिक लावली असून कानात सुंदर दागिना घातला आहे. सोनम कपूर तिच्या ड्रेसवर सतत प्रयोग करताना दिसते.
पण यावेळी तिचे हे विचित्र फोटो पाहून अनेकांनी तिला ट्रोल करणेच पसंद केले आहे. मात्र खरेतर या ड्रेसवरील स्त्रिच्या आकृतीच्या माध्यमातून सोनमला स्त्रिविषयक काहीतरी मेसेज द्यायचा आहे, मात्र त्याचा अर्थ ट्रोलरला कळलेला दिसत नाही.