मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोनम लवकरच आई होणार असून सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत तिने ही गूड न्यूज दिली आहे. तिने दिलेल्या गूड न्यूजनंतर बॉलिवूड सेलिब्रिटीजने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या बातमीने चिरतरुण अभिनेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते अभिनेते अनिल कपूर हे आता आजोबा होणार आहेत.
सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. सोनमने पती आनंद अहूजासोबत प्रेग्नेंसी फोटोशूट केले. फोटोमध्ये सोनम काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आनंदच्या मांडीवर डोक ठेवून असल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये सोनमचा बेबी बंपही दिसत आहे.
View this post on Instagram
ही पोस्ट शेअर करत सोनमने एक कवीता शेअर केली आहे. शेवटी तुझ्या येण्याची आता प्रतिक्षा करू शकत नाही असं सोनम म्हणाली. सोनम आणि आनंदचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
सोनम आणि आनंदचे लग्न २०१८ मध्ये झाले. तेव्हापासून सोनमचे चाहते या गुड न्यूजची प्रतिक्षा करत होते. सोनम सध्या पतीसोबत लंडनमध्ये राहते. करिअर विषयी बोलायचे झाले तर, सोनम लवकरच अब शोम माखिजा दिग्दर्शित चित्रपट ‘ब्लाइंड’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०११मध्ये प्रदर्शित झालेल्या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. ज्यात एका कार अपघातात एका महिलेने आपले डोळे गमावले होते.