मुंबई – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे मराठमोळी अभिनेत्री ‘सई ताम्हणकर’ मराठी रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘सई ताम्हणकर’कडे पाहिलं जातं.
विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
View this post on Instagram
तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय हे सुद्धा सई तिच्या चाहत्यांना सांगत असते.
नुकताच सईने आपल्या इंस्टाग्रामवर मांजरेचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मांजर झोपली असून तिचे नाक दिसून येत आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे की,’‘माझी pink नाकाची सुंदरी ! बकूळा aka बकू !!’ सध्या तिच्या या फोटोची चर्चा सोशलवर चर्चेत असून अनेक चाहत्यांना नक्की हा फोटो कशा संदर्भात आहे असा प्रश्न पडला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ही पोस्ट ‘पेट पुराण’ या वेबसीरीजची आहे. या वेब सिरीज सई ही लवकरच झळकणार आहे. या निमित्ताने नुकतंच तिने एक हटके फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
‘पेट पुराण’आधुनिक काळातील जोडप्याच्या मानसिकतेमधला संघर्ष दाखवते. या जोडप्याची मुले व कुटुंब नसण्याची इच्छा आहे. आणि परिपूर्ण कुटुंबाप्रती त्यांचा अपारंपारिक व आगळावेगळा दृष्टीकोन आहे. काही दिवसांपूर्वी या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला होता.