मुंबई – “प्यार का पंचनामा’ आणि “सोनू की टिटू की स्वीटी’ची स्टार नुसरत भरुचा आपल्या बोल्ड सीन आणि हॉट फोटोसेशनमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर ती चर्चेत असते. चित्रपटातील तिच्या हटके अभिनयामुळे तिने आपल्या चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.
View this post on Instagram
यातच नुसरत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच नुसरतने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटोशूट शेअर केले असून, या फोटोतून नुसरतने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. अभिनेत्री आपल्या या बोल्ड अँड बिनधास्त लुकने सर्वांनाच घायाळ करत आहे.
View this post on Instagram
नुसरत या बोल्ड फोटोशूटमध्ये लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्यात झालेला हा बदल पाहून चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे. या फोटोंवर चाहत्यांसह सेलेब्सकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे. तिचे हे आउटफिट नेहमी पेक्षा जरा हटके आहे.
View this post on Instagram
या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे. नुसरतचे हे फोटो पाहून चाहते त्यावर लाइक्स आणि कमेंट्स पाऊस पाडत असल्याचं दिसून येत आहे. तिच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास ती लवकरच जनहित में यारी, राम सेतू, गुगली या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.