नवीदिल्ली – सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस विरुद्ध आरोप पात्र दाखल करण्यात आले आहे. आता तपास यंत्रणा डान्सर नोरा फतेहीच्या सहभागाबाबत तपास करत आहेत. नोराची दिल्ली पोलिसांच्या EOW (आर्थिक गुन्हे शाखा) विभागाने जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाबाबत चौकशी केली.
यापूर्वी, नोरा फतेहीचे स्टेटमेंट सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2021 मध्ये प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायदा 2002 च्या कलम 50 अंतर्गत नोंदवले गेले होते. अभिनेत्रीने सांगितले होते की तिला एका चॅरिटी कार्यक्रमासाठी बुकिंग मिळाले होते. दरम्यान, सुकेश चंद्रशेखर यांची पत्नी लीना पाउलोज हिने नोराला गुच्ची बॅग आणि आयफोन भेट म्हणून दिला. या आधी जॅकलिनचे नाव या प्रकरणामध्ये आल्यानंतर बोलीववूडमध्ये खळबळ उडाली होती.
Delhi Police EOW (Economic Offences Wing) questioned actor-dancer Nora Fatehi yesterday in connection with jailed conman Sukesh Chandrashekhar money laundering case.
(File photo) pic.twitter.com/E7FVRYgzQ9
— ANI (@ANI) September 3, 2022
पुरवणी आरोपपत्रात ईडीने आरोप केला आहे की, “आतापर्यंत केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, आरोपी जॅकलिन फर्नांडिस हिने जाणूनबुजून, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे गुन्ह्याच्या कार्यवाहीत सहभाग घेतला आहे. जॅकलिन फर्नांडिसलाही मनी लाँड्रिंगचा फायदा झाला आहे. सुकेशने त्याच पैशातून त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी भारतात आणि परदेशात मालमत्ता खरेदी केल्या, जो की गुन्हा आहे.