भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. आपण काय करतो आहोत, हे आपल्या फॅन्सना सांगण्यासाठी सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओदेखील ती शेअरकरत असते.
View this post on Instagram
भोजपुरी ऍक्ट्रेस मोनालिसाने हा मोकळा वेळ आपल्या वर्कआऊटसाठी वापरायचे ठरवले आहे. तिने वेगवेगळे व्यायामप्रकार करण्याबरोबर थोडा हेवी वर्कआऊटही करायला सुरुवात केली आहे. याबाबत ती सतत सोशावर अपडेट देत असते. नुकताच इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट केलेल्या व्हिडियोमध्ये ती जलेबी बेबी या गाण्यावर डान्स करतांना दिसत आहे. या गाण्यावर ती मनसोक्त डान्स करताना दिसते आहे.
View this post on Instagram
यापूर्वीही तिने आपल्या बेडरूममध्ये सोफ्यावर उड्या मारत ती स्वच्छंदपणे डान्सचा व्हिडियो शेअर केला होता. आपल्या फॅन्सनादेखील तिने अशाच प्रकारे डान्स करण्याचे आणि घरबसल्या व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे.