मुंबई – अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी ८.४० वाजता निधन झाले. अशी माहिती माधुरी दिक्षिकचे कौटुंबिक सहकारी रिक्कू राकेश नाथ यांनी दिली.
Actress Madhuri Dixits Mother Mrs Snehlata Dixit passed away.
Om Shanti 🙏#MadhuriDixit @MadhuriDixit @DoctorNene pic.twitter.com/m34l6clSRj
— Ashish Mishra (@AshishMisraRBL) March 12, 2023
स्नेहलता दीक्षित यांचा घरीच नैसर्गिक मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी माधुरी दीक्षितनेही याबाबत दु:खद बातमी शेअर केली आहे. माधुरी दीक्षितने पोस्ट केली आहे की, ‘आमच्या प्रिय अाई स्नेहलता दीक्षित आज सकाळी प्रियजनांनी वेढलेल्या निघून गेल्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता वैकुंठ धाम, डॉ. ई. मोझेस रोड, जिजामाता नगर, वरळी मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.’