मुंबई – ‘सेक्रेड गेम’ ही वेब सिरीज एक वेगळीच कलाकृती म्हणून प्रसिद्ध झाली आहे. या सिरीजने सिनेसृष्टीला बरंच काही नवीन दिल. नरेशन स्टाईल पासून ते कथेला गरजेचा असलेला बोल्डनेस या सिरीजमध्ये प्रभावीपने दाखवण्यात आला आहे. म्हणुणच या सिरीजमधील सर्वच प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांसाठी खास आहेत. अभिनेत्री अनुप्रिया गोयंकाने तर तिच्या अभिनयाने संपूर्ण इंडस्ट्रीला दखल घ्यायला भाग पाडले. नुकतंच तिने सिरीजमधून आपले इंटिमेट सिन कसे काढण्यात आले याबाबत खुलासा केला आहे.
अनुप्रिया नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘असुर 2’मध्ये देखील दिसली आहे. सेक्रेड गेम्समध्ये अनुप्रियाने सैफची एक्स पत्नी मेघाची भूमिका साकारली होती. यावेळी दोघांचे इंटिमेट सिन देखील होते. अनुप्रियाने सांगितले की, शूटिंगदरम्यान सैफ तिच्यासाठी जास्त जागरूक होता. ती म्हणाला, सैफ प्रत्येक सीननंतर तिला तिच्या स्थितीबद्दल विचारायचा आणि ती कम्फर्टेबल असल्याची खात्री करून घ्यायचा.
अनुप्रिया सांगितले कि,पहिल्या सिजनमधील सर्व इंटिमेट सिन शूट झाले मात्र नंतर निर्मात्यांना ते कथेनुसार योग्य वाटले नाहीत म्हणून त्यांनी त्या सीनला कात्री लावली. यावेळी अनुप्रियाने सैफचे चांगलेच कौतुक केले. तसेच यावेळी त्याने मोठा सपोर्ट दिल्याचे देखील तिने सांगितले. सैफ अभिनेता म्हणून उत्तम आहेच परंतु माणूस म्हणून देखील तो डाऊन टू अर्थ असल्याचे अनुप्रिया यावेळी म्हणाली.
अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि नीरज घायवान दिग्दर्शित सेक्रेड गेम्समध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे आणि कुब्बरा सैत यांनीही भूमिका केल्या होत्या. या शोमध्ये सैफने इन्स्पेक्टर सरताज सिंगची भूमिका साकारली होती. या सीरिजचे संपूर्ण कथानक सैफ आणि नावाजच्या अवतीभवती फिरणारे होते.