मुंबई – अभिनेत्री अंकिता लोखंडे ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ‘पवित्र रिश्ता’ या शोमधून अर्चनाच्या भूमिकेतून ती घरोघरी लोकप्रिय झाली. अंकिताने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. अंकिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. त्याचबरोबर ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या अंकिताच्या गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या आहेत, मात्र तिने आणि तिचा पती विकीने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले नाही.
अंकिताने बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले आहे. हे कपल नेहमीच कोणत्या ना कोणत्या इव्हेंटमध्ये एकत्र दिसतं आणि चर्चेत राहतं. अनेक वर्षे विकीला डेट केल्यानंतर,अंकिताने डिसेंबर 2021 मध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले.
अंकिताने नुकतेच गोल्डन साडीमध्ये फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्री पर्समधून तिचा बेबी बंप लपवताना दिसत आहे. अशात अंकिता प्रेग्नंट असल्याचे लोकांचे मत आहे. मात्र, अभिनेत्री किंवा तिचा पती विकी जैन या दोघांनीही गरोदरपणाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. जर अंकिता खरोखरच प्रेग्नंट असेल तर तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
अंकिता लोखंडेचे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबतही अफेअर होते. ‘पवित्र रिश्ता’ या शोच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. एकत्र काम करताना त्यांनी एकमेकांना दिलं होतं. अंकिता आणि सुशांत 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ही जोडी लवकरच लग्न करणार असल्याचे चाहत्यांना वाटू लागले होते. मात्र, तसे झाले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर सुशांतने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. 2020 मध्ये सुशांतचा मृत्यू झाला असला तरी. दीड वर्षानंतर अंकिताने बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले.