मुंबई – अभिनेत्री आणि गायिका सोफी चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. फिटनेस व्हिडिओ पोस्ट करण्यापासून ते तिच्या आकर्षक व्हेकेशन पिक्चर्सपर्यंत, सोफीने तिच्या चाहत्यांना नेहमीच ग्लॅमरस लुक्सने आकर्षित केले आहे. फिटनेस फ्रीक असल्याने ती अनेकदा जिममध्ये दिसते. सध्या चर्चा आहे ती तिने पोस्ट केलेल्या सोशल मीडियावरील तिच्या पावसातील व्हिडिओची.
सोफी चौधरीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक रील शेअर केली आहे, ज्यामध्ये ती मुंबईच्या पावसात ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’ या तिच्या हिट नंबरवर नाचताना दिसते. यादरम्यान सोफीने पांढरा क्रॉप-टॉप आणि योगा पँट घातली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
जेव्हा सोफी तिच्या हिट नंबरवर नाचत होती, तेव्हा अचानक एंट्री होते एका कुत्र्याची. हा सोफीचा कोको नावाचा कुत्रा आहे, जो उडी मारत येतो आणि सोफीकडे येऊन तिला मिठी मारतो. सोफी चौधरीच्या या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या या डान्स व्हिडिओचे अनेकांनी जोरदार कौतुक केले आहे.
View this post on Instagram
व्हिडिओ शेअर करताना सोफीने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘कारण प्रत्येकाला परदेशी आवडते. अगदी कोको देखील.’ करण टॅकरने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, “हाहा, त्या कुत्र्याची एंट्री अप्रतिम आहे.” डान्स आणि कुत्र्यावरील तिचे प्रेम पाहून अनेकांनी सोफीचे कौतुक केले आहे.