मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांनी राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांच्या निर्मिती ‘फर्जी’मधून डिजिटल पदार्पण केले आहे. यांसोबत मालिकेत प्रतिभावान अभिनेते के. के. मेनन, राशि खन्ना, भुवन अरोरा, रेजिना कॅसांड्रा आणि अमोल पालेकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. ही सिरीज 10 फेब्रुवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली सध्या सर्वत्र याच सिरीजची चर्चा होताना दिसत आहे.
सध्या ही सिरीज केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर हिट झाली आहे. अनेक देशांमध्ये ‘फर्जी’ टॉप 10 च्या यादीत आला आहे. याची माहिती खुद्द शाहिदने त्याच्या इन्स्टाग्रामवर दिली आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील अभिनेत्यानं शेअर केली आहे. दरम्यान, ‘फर्जीच्या’ चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शाहिद कपूरला फर्जी वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनबाबत प्रश्न विचारण्यात आला. या शाहिदनं दिलेल्या या प्रश्नाच्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. यावेळी बोलताना शाहिद म्हणाला, ‘फर्जी वेब सीरिजचा दुसरा सीझन नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. पण त्याला थोडा वेळ लागले.
दीड ते दोन वर्ष लागू शकतात. एका प्रोजेक्टच्या पोस्ट प्रोडक्शनला एक वर्ष लागतो. त्यामुळे मी हे सांगू शकतो की..” असं शाहिद म्हणाला आहे. दरम्यान, सध्या चर्चेत असलेली ‘फर्जी’ ही सिरीज यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर आणि यूएईमधील टॉप 10 च्या यादीत आली आहे.