मुंबई – सध्या अभिनेता रणदीप हुडा एका खास भूमिकेच्या तयारीत व्यस्त आहे त्यासाठी त्याने 18 किलो वजन कमी केले असून त्याचा ट्रान्सफॉर्मेशन लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अभिनयात परफेक्टपणा येण्यासाठी अनेकदा अभिनेते आपल्या शरीरयष्टीवर जोरात काम करताना दिसून येतात. रणदीपणे देखील असाच प्रयोग केल्याचे दिसून येते. रणदीप हुडाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या भूमिकेशी संबंधित माहितीही दिली आहे.
रणदीप हुडाने आपल्या कारकिर्दीत अनेक चमकदार भूमिका साकारल्या असून आता तो स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. या भूमिकेच्या तयारीसाठी रणदीपने आपले वजन १८ किलोने कमी केले आहे. याबद्दल बोलताना रणदीप म्हणाला की तो नेहमीच खेळाशी जोडलेला असल्यामुळे वजन कमी करण्यात आणि वाढवण्यात त्याला फारशी अडचण येत नाही आणि हे त्याच्यासाठी सोपे काम आहे. त्याने एक पोस्ट देखील शेअर केली ज्यामध्ये तो लिफ्टमध्ये उभा असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, त्याचे कमी झालेले वजन आणि बदललेला लुक फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
View this post on Instagram
रणदीप नेहमीच आगळ्यावेगळ्या भूमिका साकारत असतो. ‘रिस्क’ चित्रपटातील त्याचा रोल असो किंवा वन्स अपॉन अ टाइम इन मुंबईमधील पोलीस इन्स्पेक्टर असो रणदीप अगदी सहजतेणे आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडून जातो. वीर सावरकरांच्या व्यक्तिरेखेसाठी तो घेत असलेली मेहनत लवकरच सर्वांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.