मुंबई – आलिया रणबीर सध्या आपल्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटासाठी जोरदार प्रमोशन करताहेत. चित्रपटासोबतच आलिया आई होणार असल्यामुळे दोघांचाही आनंद द्विगुणित झालेला आहे. नुकतंच आलिया आणि रणबीर ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी आलियाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. जो चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
ब्रम्हास्त्रच्या प्रमोशनसाठी आलिया रणबीर संपूर्ण देशभर फिरताहेत. आलियाने परिधान केलेल्या ड्रेसवर ‘बेबी ऑन बोर्ड’ आणि ‘लव-लव’ असा खास संदेश लिहिला होता. आलियाची ही स्टाईल अनेकांना खूपच आवडली तर आपल्या बाळाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आलियाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैदराबादला पोहोचले होते. या कार्यक्रमात नागार्जुन, करण जोहर, जूनियर एनटीआर आणि एसएस राजामौली देखील दिसले. यादरम्यान या संपूर्ण इव्हेंटमध्ये रणबीर आपल्या गर्भवती पत्नीची पूर्ण काळजी घेताना दिसला. तर आलिया देखील स्वतःची काळजी घेताना दिसून आली.